Sunday, August 05, 2007

स्वप्नायते राजनी....

मध्यरात्र ऊल्टुन गेलीये... थोडी बोचरी थंडी सुध्दा आहे.. रवि वर्मन क्रुत कथेवर आधारित ’अनाहत’ चित्रपट आत्ताच पाहुन संपवला..

’अनाहत’ चा विषय थोडा गहन होता पण योग्यरितीने हताळल्यासारखा भासला.. पंचसहस्त्र वर्षे चालत आलेल्या नियोगाच्या प्रथेवर आधारित आहे हा चित्रपट.



आधीच मी जुन्या काळात रमणारा माणुस.. त्यातुन आश्या कथेवरती आधारित चित्रपट.. म्हणजे माझं विचारमंथनात गुंतुन जाणं सहाजिकच होतं. आणी मग त्यातुन ऊपजणारा निद्रानाश .... हा अनुभव माझ्यासाठी काही नवीन नाही.. वैचारिक बांध घालण्यात आम्ही देशस्थ एकदम पुढे.. त्यातुन सौंस्थानिकांचं रक्त असल्यामुळे कालमानापरत्वे आधुनिकता आली तरी हे जुन्या गोष्टींचे वेड काही केल्या जात नाही..

किती स्वप्नमय आणी जादुमय होता तो काळ आणी त्यातील ते गद्य-पद्यसम्राट.. मग महाकवि कालिदासापासुन महाकवि दण्डि, बाणभट्ट, भास, वेदव्यास, महर्षी वाल्मिकी सर्वांच्या लेखणीतुन प्रत्यक्श देवि सरस्वतीनेच दर्शन दिलेले...

मी पोहोचलोय ऊज्जयिनी राज्यात .. माझी पर-पर-परदादी ऊज्जयिनीच्या प्रधानाची कन्या होती म्हणे... असो.. हरवलोय मी त्या वत्स्यराज ऊदयनाच्या समुद्रग्रुहात ... "स्वपनायते राजनि" ऊदयना समवेत पहुडलेली दासीवेषातल्या मगधेची राजकन्या वासवदत्तेचा विषाद पाहुन मलासुध्दा खंत वाटते आहे.. वाटतंय तिला सांगावं .. "यौगंधरायणावरती विश्वास ठेवा.. आपली लवकरच अद्न्यातवासातुन सुटका होईल.. पद्मावती समवेत महाराजांचा विवाह झाल्यावर.." ...
खरंच किती सुरेख आहे महाकविभासाचे स्वप्नवासवदत्तंम .. .

तेथुन मी निघालोय ते थेट आरण्यातील शिवालयात जाऊन थबकतोय.. एक नव युवती नुकतीच स्नान करुन अर्चनेसाठी आली दिसते आहे.. आणी राजपुत्र द्वाराजवळ नवयुवतीची अर्चना पुर्ण होण्याची वाट पहातोय... महाकविदण्डिचे बाकी नऊ कुमार तो पर्यंत नऊ दिशांमध्ये हरवलेले असावेत. मी त्याला सांगु ईच्छितो की तुम्ही सर्वजण परत जरुर भेटणार आहात.... (दण्डि रचित दशकुमारचरीतम बद्दल बोलतोय मी.. )


तसाच भटकत भटकत पहातोय तो समोर ऊभा हा तरूण ज्याला आपल्या विदुषी पत्नीने घरातुन बाहेर काढलंय.. हाच तो महान महाकवि जो कालिमातेच्या क्रुपाप्रसादाने कालिदास नाम धारण करुन आपल्या अर्धांगीनीने विचारलेल्या "अस्ति कश्चित वाग्विशेष:" या प्रश्नातील तीन शब्दांनी सुरु होणारी तीन महाकाव्य लिहीन.... धन्य ती विदुषी ... अणी धन्य तो महाकवि.........

महाकवि कालिदासांच्या मेघदुत, कुमारसंभ यांची सुध्दा आठवण होतीये.. ऊजळणीच होतीये असं म्हणाना.. शुद्रकाच्या म्रुच्छकटिक ची स्मरण होतंय ..

"सेहत के लीये" चांगलं असतं असं मनन करण .. अशी माझी स्वत:ची संकल्पना आहे.. अरे हो.. चला.. बंरं झालं पर्वा कोणीतरी विचरलंच होतं की बरेच दिवस काही लिहीलं नाहीस म्हणुन .. मी म्हटलं होतं की माझी प्रेरणाच हरवलीये.. तिचा शोध घेतोय.. बहुदा ’अनाहत’ च्या संयोगाने पुनश्च गवसल्या सारखी भासतीये...



1 comments:

Rasika Mahabal said...

Marathi chhan ahe tuz. Nice.